PM KISAN PAYMENT ही भारतीय सरकारने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेमध्ये छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक सय्यप्रदान करणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या थेट खात्यामध्ये प्रति वर्ष सहा हजार रुपये इतकी अनुदान मिळत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या खते व बियाणे घेण्यासाठी मदत व्हावी हा आहे. व तसेच शेतकऱ्यांना आपल्या पिकाची काळजी घेता यावी यासाठी या योजनेचा लाभ भारत सरकार द्वारे शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.
PM KISAN PAYMENT
PM KISAN शेतकऱ्यांना शेतजमिनीचा आरोग्य व जलसंधारण तसेच तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक संसाधने देऊन शाश्वत शेती साठी प्रोत्साहित करण्यात येत आहे
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढवून शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मदत करते. शेतकऱ्यांना योग्य वेळी आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना खते बी बियाण्यासाठी योग्य वेळी मदत पोहोचवण्यासाठी सरकार या योजनेतून मदत करत आले आहे. योग्य वेळी शेतकऱ्यांना मिळालेले आर्थिक अनुदान पेरणी व इतर बी बियाणे खरेदीसाठी खूप महत्त्वाचे ठरत आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना होणारे नुकसान कमी होत आले आहे.
PM KISAN पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्ष सरकार सहा हजार रुपये या प्रमाणात आर्थिक मदत पुरवत आली आहे दोन हजाराचे तीन समान हप्त्यांमध्ये सरकार शेतकऱ्यांना मदत करत आहे. शेती व त्या संबंधित खर्च भागवण्यास या योजनेची फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत होत आहे. तसेच या योजनेत लहान व कमी भूधारक शेतकऱ्यांना उत्पन्न सुरक्षा प्रदान करते. शेतीच्या किमतीत वारंवार चढउतार नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अनिश्चिततेचा सामना करावा लागतो. ही योजना सुरू केल्यामुळे त्यांचे आर्थिक असुरक्षितता कमी होते.
Pm kisan देशातील सर्व पात्र अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी व त्यांची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी कोणतीही असो परंतु शेतकऱ्यांना आर्थिक मदत पोहोच केली जाणार हा सर्व समावेशक दृष्टिकोन उपेक्षित समुदायांना निश्चित पाठबळ देत आहे.
पी एम किसान च्या अधिक माहितीसाठी व किसान योजनेच्या लाभार्थी स्थिती पाहण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट चा वापर करा
https://pmkisan.gov.in/