Crop loan.पिक कर्ज

पिक कर्ज म्हणजे काय

Crop loan.पिक कर्ज पीक कर्ज हा शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा विषय आहे कारण शेतकऱ्यांना बी बियाणे खते मशनरी इत्यादी गोष्टी घेण्यासाठी बँकांकडून किंवा को-ऑपरेटिव्ह बँकेकडून छोट्या कालावधीसाठी दिलेली कर्जाऊ रक्कम म्हणजे पीक कर्ज होय.

आता शेतकऱ्यांना मिळणार एक रुपयाच्या रिव्ह्यू स्टॅम्पवर पीक कर्ज

आज आपण जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांना कशाप्रकारे एक रुपया मध्ये crop loan पीक कर्ज उपलब्ध होणार आहे काही दिवसांपूर्वी नाबार्ड कडून आरबीआय शी (RBI BANK) एक करार करण्यात आला होता. ज्याच्या अंतर्गत केसीसी (किसान क्रेडिट कार्ड) च्या माध्यमातून पीक कर्ज हे डिजिटल स्वरूपात अगदी पाच मिनिटात उपलब्ध करून दिले जाणार आहे. याच्यासाठी आरबीआय आणि नाबार्ड यांच्यामध्ये सामंजस्य करार पार पडला होता. याच माध्यमातून शेतकऱ्यांचे KCC स्वीकारतात e-KCC कार्ड स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे


यासाठी 15 मार्च 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला होता या माध्यमातून बीड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना प्रयोगात्मक डेमो स्वरूपात 22 कार्ड उपलब्ध करून देण्यात आली होती, आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे त्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणारी एक लाख साठ हजार रुपयापर्यंतचीCrop loan.पिक कर्ज मुद्रांक शुल्क शिवाय वितरित केली जातील व वाटप केली जातील अशी घोषणा करण्यात आली होती. आणि याच अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून एक राजपत्र निर्गमित करण्यात आलं आहे.

शासनाने राजपत्र निर्गमित केल्यानंतर बँका अशा प्रकारे एक रुपयात कर्ज वाटप करतील की नाही अशा शंकांना उधाण आलं होतं परंतु याच पार्श्वभूमीवर राज्याचे सह नोंदणी महानिरीक्षक नंदकुमार काटकर यांच्या माध्यमातून सर्व बँकांना याच्या संदर्भातील सूचना व आदेश जारी करण्यात आले आहेत.


या अगोदर Crop loan.पिक कर्ज पीक कर्जासाठी पाचशे रुपये मुद्रांक शुल्क शेतकऱ्यांना भरावा लागत होतं परंतु आता एक रुपयाच्या रेवेन स्टॅम्प वरती ही नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येतील असे आदेश बँकांना देण्यात आले आहेत.

Leave a Comment