Mansoon 2024 Weather update

राज्यभरात गुरुवारी दिनांक 9 तारखेपासून सायंकाळपासून पुढील सात ते आठ दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार आहे.

Mansoon 2024 Weather update

या काळात विजा कोसळण्याचा धोका असल्याचा अंदाज हवामान तज्ञ कडून व्यक्त करण्यात आला आहे. मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलट चालला असून आज अक्षय तृतीयाचा मोठा सण देखील साजरा करण्यात येत आहे. अक्षय तृतीया झाल्यानंतर काही दिवसातच मान्सूनचे आगमन होत असते.

सध्या राज्यभरात पावसाचे वातावरण असल्यामुळे यंदा मान्सून लवकर येणार का अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये घडून येत आहे. संभाजीनगर बीड जालना अहमदनगर परभणी बुलढाणा वाशिम पंढरपूर नाशिक स्वराज्य भरात सध्या अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले असून पुढील सात ते आठ दिवस या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडणार आहे.

विशेष बाब अशी की हवेतील बाष्पाचे प्रमाण देखील आता वाढलेले आहे ही गोष्ट मान्सून आगमनासाठी चांगली ठरत आहे. तसेच या वातावरणावरून मान्सूनच्या आगमनाची तयारी सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नांदेड लातूर परभणी धाराशिव वाशिम सोलापूर या जिल्ह्यात 16 ते 18 मे पर्यंत पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात राहील. यवतमाळ वर्धा चंद्रपूर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात गुरुवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 10 मे ते 13 मे पर्यंत वरील जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण राहील.

तसेच मान्सून वेळेआधी अंदमान मध्ये दाखल होणार अशी माहिती हवामान तज्ञांकडून देण्यात येत आहे यावर्षी 17 किंवा 18 मेला मान्सून दक्षिण अंदमान मध्ये दाखल होणार आहे. दरवर्षी अंदमानत वीस किंवा 21 मे ला मान्सूनचा आगमन होत असते. यावर्षी तो तीन-चार दिवस अगोदरच दक्षिण अंदमानत पोहोचणार आहे.

नाशिक व नगर जिल्ह्यासह काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार

नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यात गुरुवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. व पुढील दोन दिवसात देखील पाऊस पडेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आला आहे. नगर धाराशिव नाशिक लातूर सातारा कोल्हापूर पुणे सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. दिनांक दहा मे पासून ते 13 मे पर्यंत मेघगर्जना सह विजांच्या कडकडाट पाऊस होऊ शकतो. खास करून नगर बारामती पंढरपूर व नाशिक या ठिकाणी चांगला पाऊस होऊ शकतो.

Leave a Comment