सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्याचे पाहायला मिळत आहे.(mansoon update)
हवामान खात्याने यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवला आहे. तसेच महाराष्ट्राचे हवामान तज्ञ पंजाब राऊत यांनी सुद्धा राज्यात पुढील काही दिवस मुसळधार व वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे.
(mansoon update)तसेच पुढील चार ते पाच दिवस राज्यातील मध्य महाराष्ट्र सातारा सांगली अहमदनगर सोलापूर मराठवाडा नाशिक कोल्हापूर आणि मराठवाडा विभागातील लातूर धाराशिव बीड तसेच छत्रपती संभाजी नगर या भागात मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात 14 ते 15 जून पर्यंत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. म्हणजेच पुढील चार ते पाच दिवस राज्यात ठीक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचे आपल्याला चित्र पहायला मिळेल.
तसेच पंजाबराव आणि पुढे बोलताना सांगितले की मराठवाड्यात दक्षिणेकडे जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. व मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची जोरदार हजेरी लागू शकते असे त्यांनी या अंदाज माहिती दिली आहे. 15 जून नंतर राज्यात दोन दिवस पावसाची विश्रांती राहून पुन्हा 18 जून नंतर महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
5 thoughts on “Mansoon update”