यंदाच्या वर्षी पडलेल्या भीषण उष्णतेमुळे सर्वांचे डोळे पावसाची वाट पाहत असून लवकरच पावसाची सुरुवात व्हावी अशी सर्व नागरिकांची इच्छा होती.
त्यातच आता हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. मे महिना संपून आता एक जून चालू झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आता मान्सूनचा आगमनाकडे लागलेले आहेत
त्यातच आता हवामान खात्याने अंदाज वर्तुळलेला असून हवामान खात्याने सांगितले आहे की केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले असून 30 मे रोजी तो केरळ दाखल झाला आहे.
हवामान खात्याचा अंदाज असा होता की 31 मे ला मान्सून केरळमध्ये दाखल होईल परंतु त्यांच्या अंदाजापेक्षा एक दिवस आधी म्हणजेच 30 मे लाच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. दरवर्षी मान्सून केरळमध्ये एक जुलै दाखल होत असतो परंतु या वर्षी मात्र तो दोन दिवस अगोदरच दाखल झाल्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मान्सूनला आलेला पाहायला मिळेल. तसेच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी सुद्धा हवामानाचा नवीन अंदाज सांगितला आहे.
काय सांगतोय पंजाबराव डख हवामान अंदाज.
पंजाबराव यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार सध्या महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात जोरदार वारे वाहत आहेत ते आता बंद होणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रात तीन जून किंवा चार जून दरम्यान कोकण किनारपट्टी भागात पाऊस हजेरी लावू शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
अर्थातच उद्या किंवा परवापासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊ शकते असे पंजाबराव यांनी सांगितले आहे. तसेच तीन जून पासून सुरू झालेला पाऊस हा 11 जून ते 12 जून पर्यंत सतत होऊ शकतो असे देखील त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस मार्ग क्रमांक करणार आहे तीन ते चार दोन जून दरम्यान राज्यातील राजधानी मुंबई नगर सातारा सांगली कोल्हापूर पुणे लातूर नांदेड या भागात पाऊस पडू शकतो असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ आणि खानदेशातील काही जिल्ह्यांमध्ये सहा ते सात जून पासून 11 जून पर्यंत पाऊस पडू शकतो असं देशी देखील त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे समाधानकारक गोष्ट म्हणजे उद्या किंवा परवापासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे.
जास्त किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस जर झाला नाही तर शेतकऱ्यांनी लगेच पेरणी करू नये असा अहवाल त्यांनी केला आहे जवळपास पाऊस पडल्यानंतर अर्धा फूट ओलावा जमिनीमध्ये तयार झाला तरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं पंजाबराव यांनी सांगितला आहे.
तसेच पंजाबराव आणि पुढे बोलताना सांगितले सात किंवा आठ जून नंतर महाराष्ट्रात मान्सून मोठ्या प्रमाणावर सक्रिय होणार आहे.
त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असून लवकरच पाऊसला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता शेतीतले कामे आटपून घेण्यास सुरुवात केली असून पावसाची शेतकरी चातकाप्रमाणे वाटप पाहत आहेत. तसेच यंदा झालेल्या भीषण उष्णतेमुळे देखील सर्व नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.