अटल बांबू समृद्धी योजना

अटल बांबू समृद्धी योजना रोपे घेण्यासाठी मिळवा अनुदान आणि पिकवा हिरवे सोने

अटल बांबू समृद्धी योजना


बाबू शेती ला चालना मिळण्यासाठी अटल बांबू समृद्धी योजना शासनामार्फत राबवली जात आहे या योजनेअंतर्गत तीन वर्षासाठी प्रत्येक रोपाला 120 रुपये अनुदान देण्यात येत होते परंतु आता रुपये अनुदान तीन वर्षाच्या कालखंडात विभाग मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता बांबू शेती पिकवण्यासाठी मोठी संधी तयार झाली आहे. याच्या अगोदर एक हेक्टर क्षेत्राकरिता 60 टिशू कल्चर रुपये सवलतीमध्ये भेटली जायची
मात्र रोपांच्या देखभालीकर्ता शासन निर्णयात तर तरतूद करण्यात आलेली नव्हती, 28 फेब्रुवारी 2024रोजी महसूल व वन विभागाने अध्यादेश निर्गमित करत शेतकऱ्यांना दोन हेक्टर साठी बाराशे रुपये लागवड व देखभाल खर्चासाठी 175 रुपये प्रत्येक रोप त्यासाठी तीन वर्षाच्या कालखंडात विभागून मिळणार आहेत.

काय आहे अटल बांबू समृद्धी योजना
शेतकऱ्यांना आता अटल बांबू समृद्धी योजना अंतर्गत तीन वर्षासाठी प्रत्येक रोपाच्या पाठीमागे साडेतीनशे रुपये खर्च अपेक्षित आहे त्यापैकी अनुदान म्हणून 50 टक्के रक्कम तीन वर्षात शेतकऱ्यांना विभागून देण्यात येणार आहे. तसेच जर शेतकऱ्यांना वन विभागामार्फत रोपट्यांचा पुरवठा झाला तर त्या रोपांच्या अनुदानाच्या पहिल्या वर्षाची किंमत हप्त्या मधून वजा केली जाणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही.

रोपट्यांच्या वाढीसाठी अनुदान

राष्ट्रीय बांबू अभियान योजनेच्या समांतर अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये बांबूची रोपे उपलब्ध करून देण्यासोबतच बी बियाणे खते पाणी देणे संरक्षण करणे या कामासाठी सुद्धा अनुदान दिले जाणार आहे. मागील काही वर्षांमध्ये मजुरीचे दर वाढले असल्या कारणाने शेतकऱ्यांना प्रतिरोपटे 175 रुपये दिले जातील. पहिल्या वर्षी 90 रुपये दुसऱ्या वर्षी 50 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 35 रुपये प्रत्येक रोपट्या मागे दिले जातील.

कोणा कोणाला मिळणार लाभ

हॉटेल बांबू समृद्धी योजनेसाठी शेतकरी उत्पादक संस्था शेतकरी बांबू शेतकऱ्यांचा समूह कंपनी यांना प्राधान्य दिले जाईल त्यानंतरच वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचा विचार केला जाईल. सवलतीच्या दरात बांबू घेऊन शेतकऱ्यांना आता लागवड करता येईल व त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देखील मिळेल शेतकऱ्यांनी जर खाजगी रोपवाटिकेतून रोपे विकत घेतल्यास त्याचे विल सादर करावे लागेल.

टिशू कल्चर बांबू रोपा करिता आठ प्रजाती

विदर्भात आढळून येणारी मानवेल कटार तर कोकण विभागात आढळणारी माणगा ही स्थानिक प्रजाती बांबू लागवडीसाठी शासनाने ग्राह्य धरले आहे. याशिवाय बालकुवा, डद्रो कॉल्मस, अस्पर, नूतन तुलडा आदी पाच प्रजाती निवडण्यात आलेले आहेत.

Leave a Comment